अडथळे पार करून कोपरगावचा विकास करणार - आशुतोष काळे

अडथळे पार करून कोपरगावचा विकास करणार - आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था योजनेला तांत्रिक मंजुरी ऑक्टोबर महिन्यातच मिळाली होती व प्रशासकीय मंजुरी देखील तातडीने मिळाली असती मात्र चांगल्या कामांना खोडा घालणार्‍या वृत्तींमुळे काहीसा विलंब झाला असला तरी कोपरगावकरांचे आशिर्वाद माझ्यामागे खंबीरपणे होते म्हणून हे काम होऊ शकले. यापुढे देखील शहराच्या विकास कामांना कितीही अडथळे आले तरी जनतेच्या आशीर्वादाने कोपरगावचा कायापालट करून दाखवील, अशी ग्वाही साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था कामासाठी 131.24 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी 5 नं. तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 131.24 कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून श्री साईबाबा संस्थान, शिर्डी तसेच कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असणारी विकासकामे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे सर्वांच्यावतीने शहर विकासाचे काम करून दाखवू, असा विश्वास आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे प्रमुख उदयन दळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष साळुंके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सपना मोरे, राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस रेखा जगताप, विद्यार्थी शहराध्यक्ष निखील डांगे, युवासेना विस्तारक सुनील तिवारी, वाहतूकसेना जिल्हाध्यक्ष इरफान शेख, विरेन बोरवके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजिज शेख, नगरसेविका शिंगाडे, शहरप्रमुख राखी विसपुते, उपशहरप्रमुख आश्विनी होन, युवती सेनेच्या अक्षीता आमले, एस.टी. कामगार सेनेचे किरण बिडवे, अरुण वाणी, सुनील शिलेदार, रमेश गवळी, डॉ. आतिष काळे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शेखर कोलते, उपाध्यक्ष दत्तू पगारे, प्रफुल्ल शिंगाडे, योगेश उशीर, विकास शर्मा, सुनील कुंढारे, मयूर दळवी, राकेश वाघ, अमजद अविनाश धोक्रट, किरण कुटे, जाफर सय्यद, राहुल देशपांडे, अविनाश वाघ, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब साळुंके, वैभव गिते, श्रीरंग चांदगुडे, वसीम शेख, विजय सोनवणे, आकाश डागा, संदीप सावतडकर, ऋषीकेश खैरनार, नारायण लांडगे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.