नुसतेच पत्र देऊन कामे होत नसतात

त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो : आ. आशुतोष काळे
नुसतेच पत्र देऊन कामे होत नसतात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

ग्रामीण रुग्णालयाचे (Rural Hospital) श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital) व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे (Ministry of Health) निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) कोपरगावला (Kopargav) 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली असून हि मंजुरी कोणत्या साली दिली हे आरोग्य मंत्रालयाच्या त्या मंजुरी पत्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्यामुळे जर का कोणी म्हणत असेल मी पत्र दिल्यामुळे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय झाले तर ते संपूर्ण चुकीचे आहे. नुसतेच पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो अशी टीका (criticism) आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे (Former MLA Snehalta Kolhe) यांचेवर केली आहे.

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत 70 लक्ष निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात (Kopargaon Rural Hospital premises) बांधण्यात येणार्‍या 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड वॉर्डचे भूमिपूजन मंगळवारी आमदार आशुतोष काळे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले, ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे काम (Oxygen Production Work) प्रगतिपथावर असून येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. 30 बेडच्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, अभियंता प्रशांत वाकचौरे, सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, इम्तियाज अत्तार, नारायण लांडगे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, जावेदभाई शेख, धनंजय कहार, मनोज कडू, डॉ. आतिष काळे, प्रशांत वाबळे, डॉ. दीपक पगारे, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. कुणाल घायतडकर, चंद्रशेखर म्हस्के, गणेश लकारे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, ठका लासुरे, राजेंद्र जोशी, एकनाथ गंगुले, योगेश वाणी, विजय त्रिभुवन, शुभम लासुरे, नितीन शिंदे, राकेश शहा, लक्ष्मण सताळे, किरण बागुल, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.

पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र श्रेय घेण्यासाठी माजी आ. कोल्हे उपजिल्हा रुग्णालय माझ्या पत्रामुळे झाल्याचे सांगत आहेत. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित पत्रकारांना आरोग्य मंत्रालयाचे मंजुरी पत्र दाखविले. आ. काळे यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या मागणीनुसार कोपरगाव ग्रामीण रुग्णालय 30 खाटांवरून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता असा स्पष्ट उल्लेख असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करून कोल्हेंचे श्रेय घेण्याचे मनसुबे उधळून लावले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com