मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून जनावरांच्या डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवा

डॉ. बाळासाहेब सोनवळे : पद्विकाधारक पशुवैद्यकांचे आ. जगतापांना साकडे
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून जनावरांच्या डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात पदविकाधारक (Diploma holders in the state) पशुवैद्यकांचे प्रलंबित मागण्यांसाठी (Pending demands of veterinarians) 15 जूनपासून आंदोलन सुरू (Movement Start) आहे. आंदोलनाचा (Movement) आता पुढील टप्पा असून पशूसंवर्धन विभागाचे आयुक्तांचे (Commissioner of Animal Husbandry) या डॉक्टरांचा (Doctor) प्रश्‍न सोडवावा, याप्रश्‍नी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी जनावरांच्या डॉक्टरांच्या संघटनेने आ. अरूण जगताप (MLA Arun Jagtap) आणि आ. नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून केली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब सोनावळे (Dr. Balasaheb Sonavale) यांनी सांगितले, पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) गट ‘अ’ सेवा प्रवेश नियमात सरळ सेवेने 85 टक्के, गट अ 15 टक्के, पदवीधर पशुवैद्यक 5 टक्के पदोन्नतीने अशी तरतूद असावी. पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor), सहायक पशुधन विकास अधिकारी, गट ब संवर्गातील कर्मचार्‍यांना देण्यात सहायक आयुक्त सेवाप्रवेश नियममधील तरतुदीप्रमाणे वेतनस्तर सुधारित आदेशानूसार व्हावा, ग्रामसेवक व कृषी सहायक (Agricultural Assistant) यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्‍यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर व्हावा, पदविका प्रमाणपत्र धारकांची भारतीय पशुवैद्य कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट व्हावा, तसेच शासन अधिसूचना (Government Notification) 2009 रद्द करून सुधारित अधिसूचना काढण्यात यावी.

पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी (Officers and staff of Animal Husbandry Department) यांना फ्रन्टंलाइन वर्कर (Frontline Worker) घोषित करून विमा संरक्षण कवच (Insurance protection shield) व अत्यावश्यक सेवेतील सुविधा मिळाव्यात, राज्यात बारावी विज्ञाननंतर तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषयक पदविका विषयक अभ्यासक्रम सुरू करावा आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमाचा (Open University Courses) शासन निर्णय पुनर्जीवित करावा, प्रादेशिक असमतोल पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचना पुनर्विलोकन अहवालाप्रमाणे पदांचा समतोल साधावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पारनेर तालुका तालुकाध्यक्ष डॉ. पोपट मापारी, डॉ.मच्छिंद्र घोडके, डॉ. रामकृष्ण लगड, डॉ. भाऊसाहेब बांगर, डॉ. अशोक पवार, डॉ. ज्ञानेश्‍वर गांगर्डे, डॉ. सुरेश ढवळे, डॉ. राजेंद्र रोहोकले, डॉ. संतोष साळुंके, डॉ. जयप्रकाश शिंदे, डॉ. आनंद शिंदे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com