पवार यांच्या येण्यामुळे राष्ट्रवादीचे 100 आमदार होतील - आ. मिटकरी

पवार यांच्या येण्यामुळे राष्ट्रवादीचे 100 आमदार होतील - आ. मिटकरी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

पावसातील भिजलेली एक सभा ही जर महाराष्ट्राचे चित्र बदलवू शकते. तर हॉस्पिटलमधून शिर्डीत आलेले शरद पवार दहा मिनिटं बोलल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप होवु शकतो! हे येणार्‍या काळात कळेल. ते आले आणि दहा मिनिटात आम्हाला ऊर्जा देवुन गेले. हे भविष्यात राष्ट्रवादीच्या जागा शंभरच्या वर जाण्याचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रीया मंथन शिबिरानंतर राष्ट्रवादीचे तरुण आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

आमदार मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या सांगतेनंतर संभाजी ब्रिगेडचे त्यांचे मित्र प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद निमसे व राजमाता जिजाऊ चित्रपटाच्या निर्मात्या सौ. मंदाताई निमसे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे युवा नेते संतोष भागडे, दादा महाराज रंजाळे हे उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात सरकारच्या माध्यमातुन वाढती महागाई, बेरोजगारी, ओला दुष्काळाचे सावट, महाराष्ट्रातुन गेलेले प्रकल्प, लांबलेल्या पोलिस भरती, कृषी मंत्र्यांचे दूर्लक्ष यामुळे राज्यातील जनता या सरकारला कंटाळलेली आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन असेल असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला.

आघाडी बाबत बोलतांना आमदार मिटकरी म्हणाले, तीनही पक्ष एकत्र लढले, तरच भारतीय जनता पार्टीचे सुडाचे राजकारण थांबवू शकते. वारंवार असे आमच्या पक्ष श्रेष्ठींनी सांगितले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित लढले पाहिजे. ज्येष्ठ पत्रकारांचे ही या मंथनात विचार प्रकट झाले. तिनही पक्षांनी एकत्र लढल्यासच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com