तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी

तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

करोना एकल महिलांना मदतीचा हात देण्यासाठी गठीत तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीची बैठक दर आठवड्यात घेण्याचा शासन आदेश आहे. पण या शासन निर्णयाचे उल्लंघन करीत श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीची बैठक तब्बल ८२ दिवसांनी झाली.

समिती अध्यक्ष तहसीलदार प्रशांत पाटील तातडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत बैठक झाली. गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, समितीच्या सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्पाधिकारी आशा लिप्टे, अशासकीय सदस्य व महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, नायब तहसीलदार सी. के. दुर्गे, तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी विकास बागुल, सहायक बालविकास प्रकल्पाधिकारी सी. व्ही. भारती, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक हरिष पैठणे, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आर. डी. अभंग, विजय चराटे, आरोग्य सहायक बी. एस. बनसोडे, तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे एस. एन. पिरजादे बैठकीस उपस्थित होते. पालिकेचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी हे शासकीय अधिकारी सदस्य गैरहजर होते.

तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

दर आठवड्याला समितीची बैठक घेण्याचा शासन आदेश असताना आपणच हा आदेश पायदळी तुडवीत आहोत, असा आरोप बैठकीच्या सुरूवातीलाच अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केला. तसेच त्यांनी शासन निर्णयाप्रमाणे दर आठवड्याला बैठका घेण्याची मागणीही केली. करोना एकल महिलांची संजय गांधी निराधार योजनांची प्रकरणे उशिरा मंजूर करणे, मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात पैसे वर्ग न करणे, शिधापत्रिका असूनही धान्य न मिळणे याचा पाठपुरावा प्रत्येक बैठकीत करावा लागतो, याचा अर्थ कोरोना एकल महिलांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकारी वर्गांची ऊदासीनता दिसत आहे, याकडे साळवे, जपे यांनी लक्ष वेधले.

तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य
तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी
बॉक्स ऑफिसवर RRR चा दबदबा; The Kashmir Files ला जोरदार टक्कर

उंबरगांव येथील कविता परभणे या महिलेच्या घरकुलासाठी अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. पण कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या घरकुलाचे बांधकाम व अनुदान पंचायत समितीने बेकायदेशीरपणे थांबविले आहे. तातडीने यातून मार्ग काढून या महिलेस दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

करोनामुळे आई, वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक खर्चासाठी १० हजार रूपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना साळवे व जपे यांनी केली. त्यावर गटविकास अधिकारी धस यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणार असल्याचे सांगितले.

तब्बल ८३ दिवसांनी झाली मिशन वात्सल्यची बैठक, अखेर समितीला आली जाग; शिक्षणासाठी निधी
Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स... काय आहे प्रकरण?

Related Stories

No stories found.