बेपत्ता युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

आत्महत्या की घातपात याची चर्चा
बेपत्ता युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील जांबवाडी येथील अनेक दिवसांपासून बेपत्ता आसलेल्या एका तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि.14) शेतातील झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा रंगली आहे.

संतोष नामदेव सागडे (34, रा. जांबवाडी, ता. जामखेड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 सप्टेंबर पासून संतोष हा बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तो हरवला असल्याची तक्रार देखील नातेवाईकांनी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यादृष्टीने पोलीस संतोषचा शोध घेत होते. बुधवारी संतोषचे नातेवाईक अशोक अप्पा तोडकर व त्यांचा मेव्हणा नवनाथ हे जुन्या जांबवाडी परीसरातील शेतात बैलं बांधण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातील झुडूपांच्या आतमध्ये संतोषचा मृतदेह लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com