
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
दहावीच्या बोर्डाचा निकाल आणण्यासाठी दोन मित्रांसह बाहेर पडलेला 16 वर्षांचा युवक आपल्या दोन मित्रांसह बेपत्ता झाला आहे. ही घटना राहाता येथे घडली आहे.
राहाता येथील खंडोबा चौकातील दीपक विजय मोरे (वय 16), गणेश दिलीप बर्डे (वय 17), किसन रमेश कुर्हाडे (वय 17) अशी बेपत्ता असलेल्या युवकांची नावे आहेत. या संदर्भात दीपक मोरे याचे वडील विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 जून रोजी दीपक विजय मोरे हा दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी सकाळी 7 च्या सुमारास दाहवीच्या बोर्डाचा निकाल आणतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवरून की जी नुकतीच घेतली होती.
ती बिगर नंबरची आहे. होंडा कंपनीची ग्रे रंगाची मोटारसायकलवरून तो आपले मित्र गणेश दिलीप बर्डे, व किसन रमेश कुर्हाडे यांचेसह बाहेर पडला असता त्यांना कुणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आमचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. अशी फिर्याद विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा रजि. क्रमांक 264/ 2022 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे करत आहेत.
यातील दीपक विजय मोरे हा 16 वर्षांचा असून त्याची उंची 5.5 फूट रंगाने गोरा, अंगात तपकिरी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट असे त्याचे वर्णन आहे.
गणेश दिलीप बर्डे हा 17 वर्षांचा असून त्यांची उंची 5 फूट 6 इंच, रंगाने काळा सावळा, नाक सरळ, चेहरा उभट, केस वाढलेले अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पोपटी रंगाची पँट, पायात चप्पल असे त्याचे वर्णन आहे.
किसन रमेश कुर्हे हा 17 वर्षांचा असून त्याची उंची 5. 3 फूट असून रंगाने गोरा, चेहरा गोल, केस काळे मध्यम नाक, सरळ मिशी अंगामध्ये शारदा कॉलेजचा लालसर रंगाचा चेक्सचा शर्ट व लालसर रंगाची पँट आहे.
दरम्यान यातील दीपक विजय मोरे हा दहावीच्या परीक्षेत नापास झाला असल्याने त्या दिशेने राहाता पोलीस तपास करत आहेत.