भोकर येथील बेपत्ता दीपक बर्डेला पळवून नेलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा

भोकर येथील बेपत्ता दीपक बर्डेला पळवून नेलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भोकर येथील बेपत्ता असलेल्या दीपक बर्डेला पळवून नेलेल्या आरोपींनीच त्याचा खून केला असून अटक झालेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केली. हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची या घटनेसंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शिष्टमंडळ अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना भेटले. मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, हिंदुत्ववादी नेते सुनील मुथ्या, शिवसेनेचे अरुण पाटील, कामगार नेते नागेश सावंत, नगरसेवक किरण लुणीया, शिवप्रतिष्ठानचे प्रवीण पैठणकर, आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डूंगरवाल, धर्मजागरणचे देविदास चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे, भाजपचे नेते शशिकांत कडुस्कर, टायगर ग्रुपचे बबन जाधव आदींनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

यावेळी याठिकाणी असे प्रसंग घडत असून याला वेळीच पायाबंद घातला गेला पाहिजे. पोलीस तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा मिळता कामा नये, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी व आरोपीला शिक्षा होईल यादृष्टीने तपास व्हावा. मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, श्रीरामपुरात पोलिसींग राहिले नाही. गुंड आणि चोरांना पोलिसांची भीती राहिली नाही. मुलींना टार्गेट करून संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. लेडीज जिममध्ये अनेक गैरप्रकार घडत असून बदनामीच्या भीतीने प्रकार पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाही. काही प्रकारांमध्ये ट्रेनरच आरोपी होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

यावेळी देविदास चव्हाण, नागेश सावंत, तिलक डूंगरवाल, बबन जाधव आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी संजय यादव, गणेश भिसे, सोमनाथ पतंगे, अर्जुन कर्पे, सुरेश सोनवणे, संदीप वाघमारे, सिद्धार्थ साळवे, किशन ताकटे, महेश विश्वकर्मा, रितेश काटे, दीपक देशमुख, शरद थोरात, दीपक देशमुख, सोनू खवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com