महिलेला फोन करून केले गैरकृत्य

पतीच्या मित्राचा कारनामा; पोलिसांत गुन्हा
महिलेला फोन करून केले गैरकृत्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेला फोन करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून गैरवर्तन केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. गणेश विठ्ठल चव्हाण (रा. बडोदा बँकेच्या शेजारी, गुलमोहर रोड, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. दरम्यान गणेश चव्हाण हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

27 जानेवारी, 2023 रोजी सकाळी गणेश चव्हाण याने त्याच्या मोबाईलनंबरवरून फिर्यादी महिलेच्या मोबाईल नंबरवर फोन केला.‘तुम्ही मला खूप आवडता’, असे फोनवरून बोलून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच त्याने पीडितेला वारंवार फोन करून भेटण्यासाठी सायबनला बोलवले.

दरम्यान पीडितेचे पती दोन दिवस घरी नव्हते ते मंगळवारी पहाटे घरी येताच पीडितेने त्यांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी दुपारी पीडिताने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com