मिरी, तिसगाव नळ योजनेचे फेरसर्वेक्षण सुरू - पालवे

गावांचा सामावेश करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन
मिरी, तिसगाव नळ योजनेचे फेरसर्वेक्षण सुरू - पालवे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या मिरी - तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या फेरसर्वेचे काम पुन्हा एकदा सुरू झाले असून ज्या गावातील वाडी वस्तीचा या योजनेत समावेश करायचा राहिला असेल अशा गावातील सरपंचांनी व प्रमुख ग्रामस्थांनी संबंधित योजनेच्या ठेकेदाराशी संपर्क साधून या नळ योजनेत आपल्या गावचा, वाडीचा समावेश करण्याचे आवाहन माजी सभापती संभाजी पालवे यांनी केले आहे.

याबाबत पालवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मिरी तिसगाव नळ योजनेत ज्या गावांचा नव्याने समावेश करायचा आहे त्यासाठीचा हा शेवटचा सर्व्हे आहे. एखादी वस्ती किंवा वाडी गाव या योजनेत समावेश करायचे राहिले असेल तर त्या गावच्या सरपंचांनी तात्काळ संपर्क करावा. पुन्हा या योजनेसंदर्भात सर्व्हे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या योजनेच्या पाण्यापासून एखादं गाव वंचित राहू नये अशी भावना पालवे यांनी व्यक्त केली.

मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेतून काही लाभधारक गावांनी पाण्याची गरज नाही म्हणून या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नव्याने ज्या गावांना या योजनेच्या पाण्याची गरज आहे अशी बारा गावे या योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आली. आता या योजनेत सध्या 43 गावांचा समावेश असून ज्या गावांना या योजनेच्या पाण्याची आवश्यकता आहे त्या वाडीवस्तीवरील गावांनी सध्या सुरू झालेल्या सर्वेमध्ये आपल्या वाडीचा अथवा गावाचा समावेश करावा, असे आवाहन पालवे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com