मिरी-तिसगाव योजनेच्या अध्यक्षावर अविश्‍वास

33 पैकी 23 सरपंचांनी केली ना. तनपुरेंसमोर नाराजी व्यक्त
मिरी-तिसगाव योजनेच्या अध्यक्षावर अविश्‍वास

करंजी (वार्ताहर) - पाथर्डीत तालुक्यातील मिरी-तिसगाव नळ योजनेच्या अध्यक्षाच्या कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त करत 33 गावांपैकी 23 सरपंचांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत या योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.

पाथर्डी तालुक्यातील 28, नगर तालुक्यातील 3 व राहुरी तालुक्यातील 2 अशा 33 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या योजनेच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने सरपंचांना नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे. यासंदर्भात पाथर्डीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित सरपंच व ग्रामसेवकांची बैठक झाली. यात 23 गावच्या सरपंचांनी आटकर यांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर ‘आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही व पाणीचोरांवर कारवाई केली नाही तर संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करणार’, असा सज्जड दम मंत्री तनपुरे यांनी दिला. पाणी योजनेचे अध्यक्ष आटकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला असून लवकरच नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सभापती गोकुळ दौंड, जि प सदस्य पुरुषोत्तम आठरे, माजी सभापती संभाजी पालवे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, राहुल गवळी, मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, अमोल वाघ, बाळासाहेब आकोलकर, अशोक दहातोंडे, पिनू मुळे, जालिंदर वामन, आदिनाथ सोलाट, राजू शेख, सुभाष गवळी, रावसाहेब गुंजाळ, विलास टेमकर, अशोक टेमकर, सचिन शिंदे, बापूसाहेब आव्हाड, सुधाकर वांढेकर, पिंटूशेठ खाडे, राजेंद्र म्हस्के, जगन्नाथ लोंढे, राजेंद्र लवांडे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह ग्रामसेवक विस्ताराधिकारी व विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

पांढरीचापूल जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज दहा ते पंधरा टँकर पाणी चोरून नेणार्‍यांवर काय कारवाई केली, असा सवाल संभाजी पालवे यांनी केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com