मिरी सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

शेती पंपाच्या विजेचा लपंडाव : शेतकरी संतप्त
मिरी सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

करंजी |वार्ताहर| Karanji

शिराळ, चिचोंडी, कोल्हारसह, डोंगरवाडी गितेवाडी, धारवाडी, डमाळवाडी परिसरात पंधरा दिवसांपासून शेती पंपाच्या विजेचा तांत्रिक बिघाड झालेला आहे. यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मंगळवारी मिरी सबस्टेशनसमोर पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, श्रीकांत आटकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.

यावेळी शिराळचे उपसरपंच हनुमंत घोरपडे, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, डमाळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ, युवक काँग्रेसचे संजय गोरे, माजी सरपंच भानुदास डमाळे, रघुनाथ तागड, रावसाहेब कराळे, विठ्ठल गोरे, दत्तात्रय गोरे, सुरेश घोरपडे, प्रमोद घोरपडे, अशोक कराळे, बापू गोरे यांच्यासह सुमारे 30 ते 40 शेतकर्‍यांनी सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन करत या भागातील शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे लेखी निवेदन देऊन केली.

पंधरा दिवसांपासून शिराळ, चिचोंडी, कोल्हार परिसरात शेती पंपाची वीज पूर्ण दाबाने मिळत नाही. अर्ध्या रात्री शेती पंपाचा वीजपुरवठा सुरू केला जातो. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

विहिरीत पाणी आहे परंतु वीज मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. पूर्णदाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर स्टार्टर खराब होत आहे. महावितरणने रात्रीच्यावेळी नव्हे तर दिवसाला शेतीसाठी वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी मिठू मुळे, गणेश तुपे, शरद मुळे, संजय गोरे, भाऊसाहेब पोटे यांनी यावेळी केली. शेतकर्‍यांच्या धरणे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मिरी सब स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वरिष्ठांच्या संपर्कात राहून यावर मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com