मिरीत विद्यूत उपकेंद्रात शेतकर्‍यांकडून जाळपोळ

आ.तनपुरेंच्या धरणे आंदोलनात उद्रेक
मिरीत विद्यूत उपकेंद्रात शेतकर्‍यांकडून जाळपोळ

करंजी |तालुका प्रतिनिधी| Karanji

थकबाकीच्या नावाखाली शेतकर्‍यांकडून शेतीपंपाच्या वीज बिलापोटी जुलमी वसुली करून शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने आ. तनपुरेंच्या नेतृत्वात पाथर्डी तालुक्यातील मिरी विद्यूत उपकेंद्र येथे धरणे आंदोलन सुरू होते. अधिकारी सांगूनही वेळेत न पोहचल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सबस्टेशन मधील अधिकार्‍याची खुर्ची पेटून खुर्ची टेबलची देखील तोडफोड करण्यात आली.

महावितरणच्या अधिकार्‍यांसह राज्य सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला . थकबाकीचे कारण पुढे करत महावितरण कडून शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे या जुलमी वसुलीच्या निषेधार्थ माजी ऊर्जामंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या भूमिके विरोधात बुधवारी मिरी सब स्टेशन समोर धरणे आंदोलन सुरू केले. सकाळी नऊ वाजता आमदार तनपुरे शेतकर्‍यांसोबत आंदोलनास बसले त्यानंतर अर्धा पाऊण तास उशिराने महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्याने आमदार तनपुरेंसह उपस्थित शेतकर्‍यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली.

दोन तासानंतरही पाथर्डी आणि नगरचे महावितरणचे अधिकारी शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्यासाठी येत नाहीत म्हणून काही संतप्त शेतकर्‍यांनी मिरी सब स्टेशनच्या अधिकार्‍याची खुर्ची जाळून टाकली तर काहींंनी कार्यालयातील टेबल खुर्च्याची  तोडफोड केल्याने या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी आमदार तनपुरे यांनी शेतकर्‍यांना व कार्यकर्त्यांना शांत करत राज्यात आपले सरकार नसले अथवा मी जरी मंत्री नसलो तरी मतदारसंघातील शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगीतले.

 यावेळी पं स सदस्य राहुल गवळी, युवानेते अमोल वाघ, अंबादास डमाळे, संतोष गरुड, राजेंद्र म्हस्के, रवींद्र मुळे, अजय पाठक, उद्धव दूसंग, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, भीमराज सोनवणे, जालिंदर वामन, सरपंच सुधाकर वांढेकर, भागिनाथ गवळी, नागेश आव्हाड, सचिन होंडे, माणिक लोंढे, जालिंदर गवळी, अशोक गवळी, आबासाहेब गवळी, मच्छिंद्र दारकुंडे, रामदास गोरे, पोपटराव आव्हाड, कुंडलिक मचे, रामदास बुटे, रामेश्वर फसले, भाऊसाहेब बर्फे, सतीश क्षेत्रे, आबासाहेब अकोलकर, सुनील कराळे यांच्यासह 39 गावातील शेतकरी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

महावितरणचे अतिरिक्त अधीक्षक अभियंता जयंत पाटील, भरत पवार यांनी आंदोलन स्थळी येऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली. असता प्रत्येक शेतकर्‍याने थकबाकी पोटी तीन हजार रुपये भरावेत तसेच शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर शेतकर्‍यांना माहिती देण्याचे स्पष्ट करण्यात आले.

अधिकार्‍यांना कार्यालयातच कोंडले

सकाळी मिरी सब स्टेशन समोर आमदार तनपुरे आल्यानंतर शेतकरी धरणे आंदोलनास बसले आंदोलन सुरू झाल्यानंतर सुमारे पाऊण तासाने मिरी सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश पाटील उशिरा आल्याने त्यांच्यासह इतर काही अधिकार्‍यांना संतप्त शेतकर्‍यांनी कार्यालयातच कोंडून घेतले. परंतु शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्यासाठी इतर वरिष्ठ कोणी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे पाटील यांना पुन्हा कार्यालया बाहेर काढून शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्याचे सांगितले. 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com