मिरी बसस्थानकावर चहापाणी सुरू असतानाच भिडले दोन नेते

मिरी बसस्थानकावर चहापाणी सुरू असतानाच भिडले दोन नेते

तालुकाभर रंगली चर्चा

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड जवळच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेनंतर चहापाना प्रसंगी किरकोळ कारणावरून एकापक्षाचे युवा सरपंच व ज्येष्ठ नेते आपसातच भिडल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. परंतु विरोधकांना याचे आयते कोलीत मिळू नये म्हणून या दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित कार्यकर्त्यांकडून झाला.

एका पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या निमित्ताने गुरुवारी मिरी येथे एकत्र आले होते.पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एका हॉटेलमध्ये कार्यकर्ते व पत्रकार एकत्रित चहॉ पाणासाठी बसले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विविध विषयावर चर्चा सुरू असतानाच मिरी जवळील एका गावचे युवा सरपंच व मिरी येथील एक ज्येष्ठनेता यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली.

दोघेही हॉटेलमध्येच एकमेकांवर धावून आल्याने उपस्थित कार्यकर्ते देखील काही वेळ गरबडून गेले.अचानकच या दोघात सुरू झालेल्या वाद-विवादामुळे उपस्थितही आवाक झाले. अखेर या दोघांना बाजूला करत पुढील अनर्थ टाळण्यासाठी उपस्थित पत्रकारांनाच पुढे येवून वाद मिटवण्याची भूमिका घ्यावी लागली. मात्र या वादाची तालुकाभरात जोरदार चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com