क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारख्या कर्तृत्ववान व्हा- मिरा केदार

‘जिजाऊ ते सावित्री : सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानास भेंडा केंद्रशाळेत प्रारंभ
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारख्या कर्तृत्ववान व्हा- मिरा केदार

भेंडा |वार्ताहर| Bhenda

गावपातळीपासून देशपातळीपर्यंत महिला प्रत्येक क्षेत्रात धडाडीने पुढे येत आहेत. सावित्रीबाई फुलेंचे शैक्षणिक कार्य महत्वपुर्ण आहे. त्याचा लाभ घेऊन मुलींनी सावित्रीबाईंसारखे कर्तृत्वान व्हावे असे आवाहन भेंडा केंद्रप्रमुख मिरा केदार यांनी केले.

भेंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका व महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मिराबाई केदार, माजी सरपंच संगीता गव्हाणे, प्रा. उषा मिसाळ, अंजली गोरे, संजीवनी मुरकुटे, सुरेखा मंडलिक, मुख्याध्यापक माणिक जगताप, पत्रकार कारभारी गरड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंजाब शिंदे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभियानास प्रारंभ करण्यात आला.

केंद्रप्रमुख केदार पुढे म्हणाल्या,, आपल्या मुला-मुलींसाठी आपली काय भूमिका आहे हे प्रत्येक मातेने ठरविले पाहिजे. सावित्रीबाईंनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाची दारे उघडून जुन्या चालीरीती, वाईट व दुष्ट प्रथा बंद करण्याचे काम केले. स्त्रियांचे वागणे कसे असावे हे कृतीतून दाखवून दिले. मुलींनी सावित्रीच्या कार्याचा वसा घेऊन विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे व कर्तृत्ववान माता म्हणून पुढे यावे.

यावेळी स्वाती गंगावणे, सृष्टी क्षिरसागर, प्रांजल काकडे, ईश्वरी निकम, अंकिता शिनगारे, संस्कृती पोटभरे, जान्हवी शिंदे, प्रांजल एडके, ज्योती गोंडे, अनुजा देशमुख, राधिका वडणे या विद्यार्थीनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंविषयी माहिती दिली.

अंजली गोरे, प्रा.उषा मिसाळ, संजीवनी मुरकुटे, पत्रकार कारभारी गरड, मुख्याध्यापक माणिक जगताप व सुरेखा पंडित आदींनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास भक्ती कुलकर्णी, निलेशा घुणे, विमल देवकर, पावलस गोर्डे, सतिष चाबुकस्वार, संजय थोरात, कानिफनाथ दौंड, माता पालक संघाच्या रितू शिंदे, स्वाती नाचण, संगीता चिंधे, अर्चना पोटभरे, मनीषा शिंदे, दिपाली चिलगर, उज्वला लाटे, पुनम वाबळे, आसराबाई गुंड, वनिता काकडे, शुभांगी पोखरणा, मनीषा क्षीरसागर सह महिला व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com