अल्पवयीन आदिवासी मुलीचा विनयभंग करून कुटुंबियांना मारहाण

आरोपीस अटक
अल्पवयीन आदिवासी मुलीचा विनयभंग करून कुटुंबियांना मारहाण

लोणी |वार्ताहर| Loni

बारा वर्षाच्या आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या वडील व चुलत्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गोगलगाव येथील आरोपीला लोणी पोलिसांनी अटक करून विनयभंग व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.

बबन सखाराम पडवळ, रा. गोगलगाव, ता. राहाता असे आरोपीचे नाव आहे. बारा वर्षाच्या आदिवासी मुलीचा विनयभंग करून व तिचे वडील आणि चुलते यांनी त्याचा जाब विचारला असता त्यांना बांबू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याबद्दल आरोपीविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी घडल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई केली.

आरोपी बबन पडवळ याच्या विरुद्ध गु.र.नं. 119/2022 भादवि कलम 354, 354(ब), 323, 324, 341,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे सुधारित अधिनियम 2015 चे कलम 3(1)(ु)(ळ)(ळळ) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com