विद्यालयाच्या वर्गात घुसून अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

तिसगाव ठरत आहे मुलींच्या छेडछाडीचे केंद्र
विद्यालयाच्या वर्गात घुसून अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील विद्यालयाच्या वर्गात घुसून टवाळखोर युवकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.13) सकाळी घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी युवकावर पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागोपाटच्या घटनांमुळे तिसगावची ओळख मुलींच्या छेडछाडी केंद्र अशी बनली आहे.

सैबाज दिलावर पठाण (रा.तिसगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तिसगाव येथील वृद्धेश्वर विद्यालयात जेवणाच्या सुट्टीत इयत्ता अकरावीत वर्गात पठाण हा घुसला तेथे त्याने पिडीत मुलीची छेड काढत तीच्या अंगाशी झटापट केली. संबंधित मुलीच्या मैत्रिणींनी आरडा ओरड करून शिक्षक व विद्यालयातील कर्मचार्‍यांना बोलावून घेत त्या संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.

मागील आठवड्यात हनुमान टाकळी येथील दोन मुलींची भर रस्त्यावर तिसगाव येथीलच एका तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी व तिसगावसह परिसरातील तरुणांनी मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली व चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. असे असतान हा प्रकार घडल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. रस्त्यावर किंवा विद्यार्थिनी घरी जात असताना त्यांचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार या अगोदर अनेक वेळा घडले आहेत.

मात्र आता थेट विद्यार्थिनींच्या वर्गात घुसुन त्यांच्या अंगाशी झटापट करणारे व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यापर्यंत तिसगाव मधील टवाळखोर तरुणांचे धाडस वाढले आहे. अनेक वेळा छेडछाडीचे प्रकार झाल्यानंतर तिसगाव मधील काही राजकीय पुढारी पुढे येऊन राजकीय स्वार्थासाठी प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतात. परंतु अशा या मिटवा मिटवीमुळे या टवाळखोर तरुणांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिसगाव येथे बाहेर गावच्या मुलींना या टवाळखोर तरुणांचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. आता या टावळखोरांचा त्रास तिसगाव मधील मुलींना देखील सहन करण्याची वेळ येत असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.

शाळेची भूमिका मूळमुळीत

बुधवारी जेवणाच्या सुट्टीत बाहेरचा तरुण थेट वर्गात घुसून शालेय विद्यार्थिनीची छेड काढतो त्यानंतर त्या संबंधित तरुणाला शाळा व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना बोलावून घेत त्याच्यावर कारवाई करण्याची गरज होती. परंतु शाळा व्यवस्थापनाने त्या मुलाचे दोन ओळीत लिहून घेत पुन्हा शाळेत येणार नाही माझ्या माझ्याकडून चूक झाली असे लिहून घेत त्याला सोडून दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com