किरकोळ कारणातून तरूणावर खूनी हल्ला

कुठे घडली घटना?; दोघांवर गुन्हा
किरकोळ कारणातून तरूणावर खूनी हल्ला

अहमदनगर|Ahmedagar

किरकोळ कारणातून तरूणावर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रेहाण शेख (रा. रेणूकानगर, औरंगाबाद रोड) हा तरूण जखमी झाला आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील रेणूकानगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सपना चेतन सैनी, जतीन चेतन सैनी (रा. रेणूकानगर) यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमजद रशीद शेख (वय 32 रा. रेणूकानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी सकाळी अमजद शेख यांची पत्नी माहेरा घरासमोरील ओटा झाडत असताना शेजारी राहणारे नितीन सैनी व मितीन सैनी हे दोघे चिखलाने भरलेले पाय घेऊन ओट्यावरून पळत असताना माहेरा त्यांना म्हणाली, तुम्ही चिखलाने भरलेले पाय घेऊन ओट्यावर येऊ नका. झालेल्या प्रकरणाबाबत अमजद शेख यांचा भाऊ रेहाण शेख हा सपना सैनी व जतीन सैनी यांना समजवून सांगण्यासाठी गेले होता.

झालेल्या प्रकरणाचा राग मनामध्ये धरून जतीन याने रेहाण यांच्या पोटात चाकूने भोकसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी रेहाण यांना वाचविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करीत आहे.

Related Stories

No stories found.