गौण खनिज चोरांवर 16 लाखाचा दंड

पाथर्डी तहसिलदारांची दंडात्मक कारवाई
File Photo
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

विनापरवाना अनाधिकृत पणे मुरूम व खडीची वाहतूक करणार्‍या सात वाहनांवर सोळा लाख पस्तीस हजार रूपयांचा दंड पाथर्डी तहसीलदारांनी ठोठावला आहे. पाथर्डी तालुक्यातील साकेगाव शिवारामध्ये जिल्हाधिकारी यांच्या गौण खनिज भरारी पथकाने छापा टाकून वाहतूक करणार्‍या मुरूम व खडीचे वाहने पकडली होती. पुढील कारवाईसाठी ही वाहने पाथर्डी तहसील कार्यालयकडे देण्यात आली होती. त्यानुसार पाथर्डी तहसीलदार शाम वाडकर यांनी सुमारे सोळा लाख पस्तीस हजारांचा दंड केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या पथकाने शेवगाव- तिसगाव रोडवर तालुक्यातील साकेगाव शिवारात एका जेसीबीच्या साह्याने मुरूम उत्खनन करून चार ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक करणार्‍या या पाच वाहनांना छापा टाकून ताब्यात घेतले होते. तसेच शेवगाव- पाथर्डी रोडवर साकेगाव शिवारात खडी वाहतूक करणारा डंपर व टेम्पो अशा दोन वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यावर हा दंड ठोठवण्यात आला आहे.

किशोर श्रीधर पवार (रा.साकेगाव), संदीप बाबासाहेब ताटे, गणेश चंद्रभान घोडके, अशोक पांडुरंग आमटे (रा.चितळी) यांच्याकडील ट्रॅक्टरला प्रत्येकी1 लाख 1 हजार 600, शिवाजी दादाबा गर्जे (रा. पाडळी) यांच्याकडील जेसीबीला साडे सात लाख तर मधुकर विश्वनाथ रोकडे (रा शेवगाव यांचा अवैध खडी वाहतूक करणार्‍या डंपरला 2े लाख 89 हजार 400 रुपये, सिकंदर सय्यद (रा.राक्षी ता. शेवगाव) यांच्या टेम्पोला 1े लाख 59 हजार 550 रुपये इतका दंड महसूल विभागाने केला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे अनाधिकृतपणे बिना परवाना मुरूम व खडी याची वाहतूक केल्याप्रकरणी एक जीसीबी, चार ट्रॅक्टर, एक डंपर व एक टेम्पो अशी एकूण सात वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com