
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांगरमल (ता. नगर) शिवारात रविवारी (दिनांक 23 एप्रिल) रात्री नऊ वाजेच्यापूर्वी घडली. स्नेहल महादेव आव्हाड (वय 16) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्नेहल महादेव आव्हाड हिने रविवारी राहत्या घरात गळफास घेतला. रात्री नऊ वाजता तिच्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. तिला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. दरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्या का केली, याबाबतची माहिती समजू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत.