अल्पवयीन मुलीची छेड भोवली

नगर तालुक्यातील घटना || तिघांवर गुन्हा, दोघे अटकेत
जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शाळेतून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

वैभव वसंत वखरे (रा. नवीन दहिफळ ता. शेवगाव), नंदू संजय कातोरे (रा. कामरगाव ता. नगर) व किशोर बाळासाहेब पंडीत (रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील वैभव व किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी सुपा येथील शाळेतून घरी जात असताना तिघांनी तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. शिट्ट्या वाजवून छेड काढली.

हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आला. यानंतरही पुन्हा तिघे जण मुलीच्या घराकडे आले. त्यावेळी मुलीच्या वडिल व भावांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. वैभव व नंदू पसार झाले. त्यांनी किशोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री वैभवला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com