क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीची छेड

दोन तरूणांविरूध्द तोफखांन्यात गुन्हा
क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीची छेड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

क्लासला जाणार्‍या अल्पवयीन (वय 16) मुलीची छेड काढणार्‍या दोन तरूणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल मुळे व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी दिल्लीगेट परिसरात ही घटना घडली.

शुक्रवारी दुपारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची बहिण शहरातील एका क्लाससाठी जात असताना शहरातील एका खासगी होस्टेलवर राहणारे दोन तरूण त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग करत होते. त्यांनी फिर्यादीकडे पाहून हावभाव करत मोबाईल नंबरची मागणी केली. घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला. यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. तरूणांविरूध्द विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com