अल्पवयीन मुलीच्या विक्री प्रकरणी चौकशीची मागणी

अल्पवयीन मुलीच्या विक्री प्रकरणी चौकशीची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पवयीन मुलीस विक्री करून कुंटणखाण्यात पाठविणार्‍या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी उपविभगीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील मुल्ला कटर याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून तिचे धर्मांतर केले व अत्याचार केले. त्यानंतर बाबा चंडवालमार्फत शेवगाव येथील कुंटणखाना चालविणार्‍या मोनाबाई मुसवत या महिलेस विकण्यात आले, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास जिल्हाभरात यांची मोठी साखळी असल्याचा संशय येतो, अशा प्रकारामुळे समाजात अशांततेचे व धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रकाश चिते, संजय यादव, विजय लांडे, किरण लुणिया, राजेंद्र देवकर, गणेश भिसे, सिद्धार्थ साळवे, बापुसाहेब शेरकर, कुणाल करंडे, सोमनाथ कदम, सुधीर वायखींडे, रविराज बेलदार आदींची नावे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com