घरात घुसून अल्पवयीन मुलीला केले प्रपोज

युवकाविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा
घरात घुसून अल्पवयीन मुलीला केले प्रपोज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना घरात घुसून तिला प्रपोज केल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात युवकाविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित साळवे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने शनिवारी (दि. 2) फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलगी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घरी एकटीच होती. त्यावेळी घरातील मागच्या दरवाजाची कडी वाजल्याने मुलीने दरवाजा उघडला असता रोहित दरवाजासमोर उभा होता. त्याने मुलीला प्रपोज केला. मुलीने दरवाजा बंद करून घेतला व घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी रोहितच्या आई-वडिलांना सांगितले होते. दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी सकाळी मुलगी घरी एकटीच असताना रोहित पुन्हा घरी आला. त्याने मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com