अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, आरोपीला सक्तमजुरी

नगर शहरातील घटना: जिल्हा न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय 41 रा. गुलमोहर रोड, नगर) याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांनी दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल होता.

15 एप्रिल 2017 रोजी नगर शहरातील एक अल्पवयीन मुलगी पेपर सुटल्यानंतर घरी येत असताना लक्ष्मीकांत ढगे याने मुलीजवळ येत, चौथीचे क्लास कुठे आहे, अशी चौकशी करत तिचा हात पकडून गैरवर्तन केले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा दूधवाला व काही ओळखीच्या इसमांनी सदरचा प्रकार पाहिला होता. त्यांनी फिर्यादीला माहिती दिली. फिर्यादीने ढगे याला याविषयी विचारले असता, ढगे याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली होती. त्यानंतर फिर्यादी, पीडित मुलगी व इतर काही इसम चाईल्ड लाईनच्या कार्यालयात गेले.

तेथे उपस्थित असलेल्या साथीदाराने त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत ढगे याने गैरवर्तन केल्याचे सांगितले. यानंतर ढगे विरोधात विनयभंग, पोक्सो कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक के. दी. शिरदावडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com