अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग

पाच जणांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा
अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री नगर शहरात ही घटना घडली.

क्षितीज अबनावे, लेखा अबनावे (दोघे रा. मार्केटयार्डच्यापाठीमागे, नगर), गौरव कापरे (भगवानबाबानगर, सारसनगर), प्रेम व तुषार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. गौरव कापरे जून 2020 पासून फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. क्षितीज अबनावे त्याला मदत करत होता. मंगळवारी रात्री प्रेम व तुषार हे दोघे क्षितीजकडे डब्बा घेण्यासाठी आले होते.

ते फिर्यादीकडे पाहून गौरवला फोन कर असे म्हटले, तेव्हा फिर्यादीने त्यांना थांबण्यास सांगितले असता ते निघून गेले. काही वेळाने क्षितीज व त्याची पत्नी लेखा हातात दांडके घेऊन आली. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्यासोबत गैरवर्तन करून आई-वडिलांनाही मारहाण केली असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com