
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
धुलीवंदानाचे रंग खेळणार्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.7) दुपारी तालुक्यातील सरहद्दीवरील एका गावात घडली. या प्रकरणी सुनिल होडशीळ व पप्पु केकाण अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील उसतोडणीसाठी बाहेरगावी आहेत. चौदा वर्षाची मुलगी आजीजवळ राहते.
मंगळवारी पिडीत मुलगी व तिची मैत्रीण दुपारी एक वाजण्याच्या समुारास किराणा दुकानातून रंग घेवुन घराकडे परतत असताना सुनिल होडशीळ व पप्पु केकाण यांनी पिडीतेला पकडले. हे पाहुण तिची मैत्रीण घाबरुन पळुन गेली. दोघांनी मुलीला ओढत केकाण याच्या घरात नेले. पप्पु केकाण घराला बाहेरून कडी लावुन घेतली. तेथे सुनिल होडशीळ याने मुलीचे तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. तोपर्यंत मुलीची आजी तिला पाहण्यासाठी आली असता केकाण यांने घराची कडी उघडली व झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला संपवुन टाकु अशी धमकी होडशीळ व केकाण यांनी मुलीला दिली.
पीडीत मुलीच्या वडीलांनी मुलीसह येवुन पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी केकाण व होडशीळ यांच्या विरु्दध बलात्कार, बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम (पोस्को), अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गु्न्हा नोंदविला आसुन पुढील तपास पोलिस उपाधिक्षक अजित पाटील करत आहेत.