
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
अल्पवयीन मुलीस बळजबरी दुचाकीवर बसवून बदनामीची धमकी देत लॉजवर नेऊन गैरकृत्य केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीसांनी एकावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी लॉजवर टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला.संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.
प्रदीप नानासाहेब कोलते ( रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगी पायी जात असताना दुचाकीवर आलेला कोलते तीला माळीबाभुळगाव शिवारातील अॅपेक्स लॉज येथे बळजबरीने घेवुन गेला. चहा पिण्याचा बहाणा करत तीला लॉजमध्ये घेवून गेला. मुलीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता कोलते याने मुलीचे तोंड दाबुन जबरदस्तीने एका रुममध्ये नेले, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
यावेळीच पाथर्डी पोलीसांनी या लॉजवर छापा टाकला. कोलते याने मुलीला सोडुन दिले व झालेला प्रकार जर कोणास सांगितले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यावेळी तेथे पोलीसांनी कोलते यास ताब्यात घेतले तर मुलीस बालसुधारगृहात सोडण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी रोजी नातेवाईकांनी मुलीला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता प्रदीप कोलते यांनी मला जबरदस्तीने लॉजवरती घेऊन जाऊन गैर कृत्य केल्याचे सांगितले. कोलतेवर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.