
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत शहरातील एका विद्यालयात शिकणार्या 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी 54 वर्षीय व्यक्तीवर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत लक्ष्मण पवार (54) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार याने शाळेतून घरी येत असलेल्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून तुला पैसे देतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला.
हा प्रकार घरी सांगितल्यस घरच्या लोकांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली. घरी परतल्यानंतर मुलगी रडत बसल्याने आईने विचारणा केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.