अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस अटक

Arrested अटक
Arrested अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molestation) करणार्‍या आरोपीस काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी (Shrirampur Police) शिताफीने अटक (Arrested) केली आहे. पोलिसांनी या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वेळोवेळी पाठलाग करून, फोनवरून तसेच इन्स्टाग्राम व व्हॉटसअ‍ॅप या सोशल मीडिया अ‍ॅपवर अजय अशोक जखवाडे (वय 19) रा. श्रीरामपूर याने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करून वेळोवेळी जीव देण्याची तसेच मुलीच्या घरच्यांना सांगण्याची धमकी (Threat) देत मुलीस त्याचे सोबत बोलण्यास भाग पाडून मुलीच्या कॉलेजला जाऊन सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molestation) केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास आदेश दिले त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत तपास पथकाने सापळा रचून शिताफीने अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com