अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपासून बेपत्ता

अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपासून बेपत्ता

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या खंडेरायवाडी (पिंपळगाव देपा) येथील अल्पवयीन मुलगी 9 जून रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान, चंदनापुरी येथे शाळेत जाते म्हणून घरी सांगून गेली, ती अद्याप (18 ऑगस्ट) घरी परतली नसून तीन महिन्यांपासून ती बेपत्ता आहे. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.

वैष्णवी सोपान तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव असून याबाबत तिचे वडील सोपान दत्तू तळेकर (वय 42, खंडेरायवाडी) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक विद्यालयात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी 9 जून रोजी शाळेत जाण्याच्या निमित्ताने घरून निघून गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही.

अखेर पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम 363 अन्वये घटनेची नोंद घेतली. सदर मुलीचे वर्णन वय 15 वर्षे 3 महिने, रंग गोरा, उंची 5.4 इंच, चेहरा-गोल, डोळे-काळे, नाक-सरळ, केस-लांब, काळे तांबूस, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सॅण्डल असे असून ही मुलगी कोठे आढळून आल्यास घारगाव पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शालुमन सातपुते करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com