बापानेच लावून दिला अल्पवयीन मुलीचा विवाह

राहुरी तालुक्यातील घटना
file photo
file photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

बायको व मुलांना सोडून गेलेल्या बापाने (Father) आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) एका 25 वर्षीय मुलाबरोबर विवाह (Marriage) लावून दिल्याची घटना दि. 12 जुलै रोजी राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) घडली. पीडित मुलीच्या आईला माहिती मिळताच तिने न्याय मिळविण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) धाव घेतली.

file photo
Video : डोंगराईचा हिरवा शालु व वाहणारे झुळूक पाणी

या घटनेतील बापाला (Father) पहिली एक लग्नाची बायको व चार मुली, एक मुलगा आहे. सुमारे तीन वर्षापासून तो बायको-मुलांना सोडून शहरातील मुलनमाथा परिसरात एका महिलेसोबत (Woman) राहत आहे. दोन महिन्यापूर्वी त्याने पहिल्या बायकोकडून तीन नंबरच्या मुलीला घेऊन गेला. त्या बापाने मुलीच्या आईला काही एक न सांगता दि. 12 जुलै रोजी त्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह (Minor Girl Marriage) टाकळीमिया येथील एका 25 वर्षीय मुलाबरोबर विवाह राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) परिसरातील एका प्रार्थनास्थळामध्ये लावून दिला.

file photo
गोदावरीत 79848 क्युसेकने विसर्ग

या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने राहुरी येथील अ‍ॅड. हापीज मुजाहिद खान व सामाजिक कार्यकर्ते इम्रान सय्यद यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर ते सर्वजण राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गेले. मला व माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्या पीडित मुलीच्या आईने पोलीस अधिकार्‍यांकडे केली.

file photo
Video : गोदावरीला पूर आल्यामुळे काथनाल्यावर पाणी

या घटनेबाबत गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यासाठी पीडित मुलीची आई पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसली होती. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल(Filed a Crime) झालेला नव्हता. बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणारा तो धर्मगुरू कोण? त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे. विवाह झालेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सुमारे एक ते दीड वर्षापूर्वी एक लग्न लावून दिले होते. त्यानंतर पहिल्या पतीपासून सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर त्याच अल्पवयीन मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. या घटनेचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होणार का? पीडित मुलीला न्याय मिळणार का? असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.

file photo
देवळालीत दोन गटांत तुफान हाणामार्‍या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com