अल्पवयीन मुलीस पळवून नेले

अल्पवयीन मुलीस पळवून नेले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर शहरात वार्ड नं. 7 बोरावके मळा परिसरात राहणार्‍या एका कुटुंबातील 16 वर्ष वयाच्या अल्पवरीन मुलीला भरदिवसा काहीतरी अमिष दाखवून पळवून नेले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वार्ड नं. 7 बोरावके मळा परिसरातून सकाळी 11 ते 12.30 च्या दरम्यान, रहात्रा घराजवळून अज्ञात आरोपीने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून कारदेशीर रखवालीतून पळून नेले.

या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्रा आईने श्रीरामपूर शहर पोलिसात तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घारवट हे अल्पवरीन मुलीचा व तिला पळवून नेणार्‍या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com