बेलापूरची अल्पवयीन मुलगी 34 दिवसानंतर धुळ्यात सापडली

बेलापूरची अल्पवयीन मुलगी 34 दिवसानंतर धुळ्यात सापडली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर (Belapur) येथून एका अल्पवयीन मुलीस (Minor Girl) पळवून नेल्याप्रकरणातील अल्पवयीन मुलगी (Minor Girl) व अपहरण (Kidnapping) करणार्‍या तरुणास काल तब्बल 34 दिवसानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी (Shrirampur City Police) धुळे (Dhule) येथे पकडले. रात्री उशिरापर्यंत या दोघांना श्रीरामपूर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police) आणण्यात आले.

बेलापूर (Belapur) येथील एका अल्पवयीन मुलीस बेलापूर (Belapur) येथीलच आयुब सिकंदर शेख (वय 21) या तरुणाने 23जुलै 2021 फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police) आयुब शेख याचेविरुध्द फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून लावला जात नसल्यामुळे बेलापूर व श्रीरामपूर येथे मोर्चा, आंदोलन व गावबंद यासारखे आंदोलने करण्यात आले होते. यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस या प्रकरणाच्या तपासाची चक्रे सुरु केली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता. सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलगी व आरोपी आयुब शेख हा तरुण हे जळगाव जिल्ह्यात गेलेले आहेत. सदर माहिती तसेच तांत्रिक माहिती वरुन पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके व पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे जळगाव जिल्ह्यात तपासकामी गेले होते.

सदर पोलीस पथकाने जळगाव जिल्ह्यातील (Jalgav District) पाचोरा (Pachora) येथे जावुन तपास केला असता अपहरण (Kidnapping) झालेली मुलगी व आयुब शेख हा तरुण जळगाव (Jalgav) जिल्ह्यातील पाळधी (Paldhi) येथे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या पोलीस पथकाने पाळधी येथे जावुन स्थानिक पोलिसांचे मदतीने तपास केला व आरोपीने भाड्याने घेतलेल्या घरात प्रवेश केला. सदरची अल्पवयीन मुलगी व आयुब शेख यांना संशय आल्याने ते घराचे मागील दरवाजाने अंधाराचा फायदा घेवुन पसार झाले.

त्यानंतर तपासात माहिती मिळाली, ही मुलगी व तरुण हे दोघेही धुळे येथे गेलेले आहेत. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके व पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. टोपे, यांनी धुळे येथे जावुन रेल्वे स्टेशन परीसरातून अल्पवयीन मुलगी व आयुब शेख या तरुणास ताब्यात घेतले. काल सायंकाळी त्यांना श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आणले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com