अल्पवयीन मुलीला पळविणार्‍याला अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कामगिरी
अल्पवयीन मुलीला पळविणार्‍याला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस (Minor Girl) फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अटक (Accused Arrested) करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला (Department of Unethical Human Trafficking Prevention) यश आले आहे. भाऊसाहेब ऊर्फ मनोज देवराम हंडाळ (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

तपासकामी त्यांना पाथर्डी पोलिसांच्या (Pathardi Police) ताब्यात देण्यात आले आहे. मनोज हंडाळ याने एप्रिल 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा तपासकामी एप्रिल 2018 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे (Department of Unethical Human Trafficking Prevention) वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एस. बी. कांबळे करत होते.

पिडीत मुलगी व मनोज हंडाळ नगरमार्गे पुणे येथे जात असल्याची माहिती कांबळे यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक सतिष गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे, अर्चना काळे, मोनाली घुटे यांच्या पथकाने आरोपी हंडाळसह अल्पवयीन मुलीला पुणे बस स्थानकावर ताब्यात घेतले. हंडाळ याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस (Pathardi Police) करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com