अल्पवयीन मुलीचा पाठलाग; युवकास सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीचा पाठलाग; युवकास सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी न्यायालयाने युवकास भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 नुसार दोषीधरून दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शुभम आप्पासाहेब दिघे (वय 22 रा. मोतीनगर, केडगाव) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे. जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीम.एम.एच.मोरे यांनी हा निकाल दिला. सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; युवकास सक्तमजुरी
ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार
अल्पवयीन मुलीचा पाठलाग; युवकास सक्तमजुरी
पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक

सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश डी. गवळी यांनी करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदरच्या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक तसेच तपासी अधिकारी इत्यादी साक्षीदार तपासण्यात आले. सदरच्या खटल्याची गुणदोषावर सुनावणी होवून न्यायालयाने आरोपी शुभम दिघे याला भादंवि कलम 354 (डी) नुसार दोषी धरून शिक्षा ठोठावली.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; युवकास सक्तमजुरी
राहुरी स्टेशन परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com