अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणार्‍या तरुणाला अटक

कोतवालीत गुन्हा; 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणार्‍या तरुणाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश सुनील वरकड (रा. बुरूडगाव रोड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गिरीश वरकड याला सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने स्नॅप चॅट अ‍ॅपवर तिच्याशी ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून, मिस कॉल व मेसेज करून तिचा छुपा पाठलाग केला. तसेच तिला हातवारे करून तिच्याशी गैरवर्तन केले. ती कुठे आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे. तिला नगरला आणले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी मला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने आरोपी वरकड याचा ठावठिकाणा शोधून काढला. तो दिल्ली गेट परिसरामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, योगेश कवाष्टे, तानाजी पवार, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे आदीच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com