अल्पवयीन, मतीमंद मुलीवर अत्याचार

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अल्पवयीन, मतीमंद मुलीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका 11 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर 57 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख शकील सजन (रा. कुंभारगल्ली, बागडपट्टी, ता. जि.नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे, मंगळवारी रात्री सोडआठच्या सुमारास बागडपट्टी येथे अल्पवयीन, मतीमंद मुलीवर आरोपीने बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काही महिलांनी पाहिली. त्यांनी तात्काळ मुलीची आई व शेजारील लोकांना सांगितल्याने अनुचित प्रकार टळला. काही नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी आरोपीला अटक केली. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com