अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास हिमाचल प्रदेशात अटक

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास हिमाचल प्रदेशात अटक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास हिमाचल प्रदेशात जाऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शिर्डी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी जर ठरवले तर गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याला जेरबंद करू शकतात. याचा प्रत्यय शिर्डी पोलिसांनी आणून दिला. लग्नाचे आमिष दाखवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिर्डी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये काम करणारा हरी सोनार नावाच्या 22 वर्षीय तरुणाने हिमाचल प्रदेशात पळून गेले होते. पोलिसांनी तेथे जाऊन अवघ्या चार दिवसात या तरुणाला जेरबंद केले. शिर्डी पोलिसांनी हरी सोनार यांच्या विरोधात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि 363, 366 गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डी परिसरात राहत असलेले एका अल्पवयीन मुलीला 10 जानेवारी रोजी घरासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरुणाने पळवून नेले, अशी फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच शिर्डी पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील सिमला येथील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर थंडी पडली असताना त्या ठिकाणी जाऊन उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी संभाजी पाटील, पोलीस नाईक कैलास राठोड यांनी ज्या ठिकाणी हा तरुण पिडीत मुलीला घेऊन गेला होता.

त्या ठिकाणी त्याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधण्यास सुरुवात करून 2500 किलोमीटरचा चार दिवस प्रवास करून अति दुर्गम व डोंगराळ भागातील हिमाचल प्रदेशात मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणाला अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. अधिक तपास तपाशी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com