गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या; चिचोंडी पाटीलची घटना

गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या; चिचोंडी पाटीलची घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस बाळासाहेब कोकाटे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. चिचोंडी पाटील (ता. नगर) गावात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान तेजसने आत्महत्या का केली, याबाबत माहिती समजू शकली नाही. तेजस बाळासाहेब कोकाटे याने रविवारी (दि. 21) राहत्या घरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला. तेजसने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबियाला मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजसच्या आत्महत्येबाबत अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com