अल्पवयीन मुलास पळवून नेले; अज्ञात व्यक्तीवरुध्द गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलास पळवून नेले; अज्ञात व्यक्तीवरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

बेलापूर रोड, गायकवाड वस्ती येथील एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलाची आई वैशाली सचिन करपे ह्या न्यायालयीन कामकाजासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. घरी वैशाली यांच्या आई तसेच दोन मुले होती. मात्र न्यायालयीन कामकाज आटोपून घरी आल्या असता त्यांचा अल्पवयीन मुलगा राज उर्फ लकी (वय 11) हा दुपारी जेवण करून बाहेर गेला तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मुलगा राज उर्फ लकी यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले आहे, असे वैशाली करपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

लकी हा अंगाने सडपातळ असून रंगाने सावळा, उंची 4 फूट, अंगात चॉकेलेटी पांढर्‍या पट्ट्याचा टीशर्ट, काळ्या रंगाची जीन्स पँट, नाक सरळ, काळे डोळे, पायात सँडल, मांडीवर तीळ व उजव्या हाताच्या पंजावर ओम असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाचा मुलगा कोणास आढळल्यास त्यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वैशाली सचिन करपे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 696/2021 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.