
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
धक्का लागल्याचा जाब विचारल्याने अल्पवयीन मुलाला बांबुने मारहाण केली. मोहंमद हंजाला जावीद कुरेशी (वय 15 रा. जीपीओ रोड, नगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलगा व अर्जुन (वय 25, पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री मोहंमद हा घराकडे जात असताना त्याला पावणे अकरा वाजता बांबु गल्लीत एकाने धक्का दिला. धक्का दिल्याने मोहंमद खाली पडला.
त्याबाबत विचारणा केली असता त्याला शिवीगाळ केली. तेथे असलेल्या अर्जुनच्या मदतीने लाकडी बांबुने हातावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.