अल्पवयीन मुलाने चोरले 32 मोबाईल

मोबाईल विकत घेणारे दोघे अटकेत
अल्पवयीन मुलाने चोरले 32 मोबाईल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भरदिवसा उघड्या घरातून मोबाईल फोन चोरी करणार्‍या एका अल्पवयीन मुलाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीचे मोबाईल विकत घेणार्‍या दोन मोबाईल शॉपी चालकांना याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून 32 मोबाईल व दोन टॅब असा एकूण चार लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जगदंबा मोबाईल शॉपीचा चालक सतीश रघुनाथ दुबे (वय 23 रा. मोहिनीनगर, केडगाव) व अस्लम मोबाईल शॉपीचा चालक अस्लम फकीरमोहंमद सय्यद (वय 25 वर्ष रा. केडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोतवाली पोलिसांकडून सुरू असलेल्या मोबाईल चोरीच्या तपासात एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने लिंकरोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

केडगांव परिसरातून दिवसा उघड्या असणार्‍या घरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक मोबाईल फोन व टॅब चोरी केल्याची व ते मोबईल केडगाव येथील मोबाईल शॉपी चालकांना विकल्याची त्यांनी कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून 32 मोबाईल व दोन टॅब हस्तगत केले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, महिला उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com