चक्क! महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणार्‍या बोटी

अधिकार्‍यांची झाली तारांबळ ?
चक्क! महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणार्‍या बोटी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी नेवासा तालुक्याच्या पाहाणी दौर्‍यात मंगळापूर परिसरात वाळू उपसा करणार्‍या दोन लोखंडी बोटी निदर्शनास आल्याने त्यांनी ताफा थांबवून जिल्हाधिकार्‍या समोरच स्थानिक अधिकार्‍यांना धारेवर धरून बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

मंत्री विखे पाटील यांनी दुपारपासून नेवासा तालुक्यातील नूकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला. प्रवरासंगमकडून थोड्या अंतरावर असलेल्या मंगळापूर येथे एका वस्तीवर मंत्री विखे पाटील यांना दोन लोखंडी बोटी उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवून जिल्हाधिकार्‍यांसह सर्व अधिकार्‍यांना घेवून वस्ती गाठली आणि बोटीची चौकशी सुरू केली. वस्तीतील रहीवाशांची सुद्धा तारांबळ उडाली.

मंत्र्यांनी प्रश्नाचा भडीमार करून बोटीची चौकशी सुरू केली.अधिकार्‍यांना धारेवर धरून इतक्या दिवस या बोटी जप्त का झाल्या नाहीत. या प्रश्नांवर सर्व स्थानिक अधिकारी सुध्दा निरूतर झाले. तातडीने तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिले. ज्याची वस्ती आहे त्यांच्यावर पहीला गुन्हा दाखल करावा अशा सूचना त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिल्या.

मंत्र्याचा रूद्र अवतार पाहून वस्तीवरील रहीवाशी आमच्या बोटी नसल्याचे सांगू लागले.तुमच्या बोटी नाहीतर तुम्ही लावू कशा दिल्या या प्रश्नानंतर या रहीवाशांपैकी एका तरुणाने पुढे येवून नावे सांगायला सुरूवात केली. परंतू नावे सांगताना त्याचीही भंबेरी उडाली. पोलीसांनी काही नावे घेवून या तरुणाचा मोबाईल जप्त करून त्याला पुढील माहीतीसाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com