शहरातील जास्तीत तपासण्या करा - ना. थोरात

शहरातील जास्तीत तपासण्या करा - ना. थोरात

ऑक्सिजन, रेमडीसीव्हर; आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या वाढवून मिळावी - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने एकत्र येवून हि लढाई लढावयाची असून आरोग्य विभाग व प्रशासनाने येणार्‍या अडचणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवून घ्याव्यात. कोपरगाव तालुक्यात आढळून येत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास निम्मे रुग्ण कोपरगाव शहरातील असून जास्तीत जास्त तपासण्या करून कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून करोनावर नियंत्रण मिळवावे अशा सूचना महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.

करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री ना. थोरात रविवारी कोपरगाव दौर्‍यावर आले होते. कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभाग व प्रशासनाशी संवाद साधतांना त्यांनी वरील सूचना केल्या. यावेळी कोपरगाव तालुकयातील करोना परिस्थितीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती देवून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती परिस्थिती अवघड होत चालली असल्याचे सांगितले.

बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून 100 ऑक्सिजन बेड व 500 बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र एवढी मोठी व्यवस्था निर्माण करतांना याठिकाणी आरोग्य कर्मचार्‍यांची उणीव भासणार असून शासकीय यंत्रनेने कोपरगावसाठी तातडीने आरोग्य कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व रेमडीसीव्हर इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोपरगाव तालुक्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा सुरळीत करून रेमडीसीव्हर इंजक्शनचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेवून ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व कोविड केअर सेंटरला रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा करावा.

महसूल मंत्री ना. थोरात यांच्या समवेत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, खासदार सदाशिव लोखंडे, आ.सुधीर तांबे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पोलीस उपअधीक्षक. संजय सातव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी, दिगंबर वाघ, उपसभापती अर्जुन काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सुनील गंगूले, कलविंदरसिंग डडियाल, तुषार पोटे, मंगेश पाटील, धरमशेठ बागरेचा, नगरसेवक वीरेन बोरावके, संग्राम देशमुख, नितीन शिंदे, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल, योगेश गंगवाल उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com