नगर जिल्ह्यासाठी अधिक वीज स्टेशनची निर्मिती करावी- ना. थोरात
सार्वमत

नगर जिल्ह्यासाठी अधिक वीज स्टेशनची निर्मिती करावी- ना. थोरात

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी| Sangmner

उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त असल्याने 220 केव्ही व 132 केव्ही मेगा सबस्टेशन निर्मिती सोबत एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर व शेतीसाठी अतिरिक्त फिडर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वीज विभागाला केल्या असून उत्तर नगर व संगमनेरमधील विविध प्रश्नांबाबत ऊर्जा मंत्र्यांसह बैठक संपन्न घेतली.

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, संचालक संचलनालय दिनेश साबू, महावितरणचे संचालक खंडाईत, व्यवस्थापकीय संचालक आसिमदास गुप्ता उपस्थित होते. यावेळी नाशिकचे मुख्य अभियंता खंदारे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता सांगळे व कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी या अधिकार्‍यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सद्वारे सहभाग घेतला.

या बैठकीत उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त होत असल्याने शेतीसाठी स्वतंत्र फिडर निर्माण व्हावे त्याचप्रमाणे एमआयडीसी करता अतिरिक्त स्वतंत्र फिडर असावे. यासोबत 220 केवी व 132 के व्ही मेगा सबस्टेशनची निर्मिती अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

यामध्ये खांबे 33 के.व्ही. सबस्टेशन टेंडर (महावितरण),एम.आय.डी.सी. स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर करणे बाबत, एम.आय.डी.सी. सबस्टेशन 5 एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), तळेगाव सबस्टेशन 5 एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), हिवरगाव पावसा सबस्टेशन 5 एम.व्ही.ए.(सध्या 3.15 एम.व्ही.ए.) ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), देवगाव, पिंपरणे, खळी व निंबाळे सबस्टेशनला 5 एम.व्ही.ए. अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण),

पारेगाव खुर्द 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण), खिरविरे अकोले 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण), देवठाण अकोले 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण), ओव्हर लोड प्रस्तावास मंजुरी देणे, मेंढवण 132 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महापारेषण), सायखिंडी 220 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महापारेषण) या प्रश्नांबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध वीज प्रश्नांबाबत चर्चा झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com