ना.थोरात-आ.विखे यांचा विधानसभेतही रंगतो संवाद !

ना.थोरात-आ.विखे यांचा विधानसभेतही रंगतो संवाद !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

प्रवरा काठच्या दोन नेत्यांचे राजकीय शितयुध्द नगर जिल्हा कायम बघत आला. त्याची प्रचिती काल विधानसभेतही आली. राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात काल विधानभवनातील महसूल विभागा अंतर्गत असलेल्या वाळूच्या मुद्यावर सकारात्मक आणि नकारात्मकतेवर चांगलाच संवाद रंगला!

ड्रोन तंत्रज्ञान हे जमिनीचे मोजमाप करताना आता वापरले जात आहे. जमिनीच्या चतु:सिमा निश्चित करताना जिओमॅपिंग तंत्राचा वापर होतोय! या मुद्याला अनुसरून आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खात्याच्या अखत्यारितील एक प्रश्न विचारताना आगोदर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या वाळू माफीच्या संदर्भातील प्रश्नाचा धागा पकडत आ. विखे पाटील यांनी सभागृहात प्रश्न विचारला. ते म्हणाले, जमिनीचे मोजमाप, सिमा निश्चिती करताना ड्रोनचा वापर म्हणजेच जिओमॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पध्दतीने ड्रोनचा वापर करुन ज्या-ज्या ठिकाणी नदीत असे वाळुचे असे लिलाव केले जातात. बेकायदेशीर खणन केले जाते. त्यामुळे जमिनी उध्दवस्त होतात. नदीकाठच्या जमिनी पुर्णत: उध्वस्त झालेल्या आहेत. ड्रोनचा वापर अशा पध्दतीने जिओमॅपिंग करुन या वाळु माफियांच्या संदर्भात त्याचा वापर महसुल विभाग करणार आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात या प्रश्नाचे उत्तर देतांना म्हणाले, सन्माननिय सदस्यांना मला नकारात्मक उत्तर देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी जे विचार मांडले त्याचा आवश्य विचार करुन योग्य निर्णय घेवू!

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नकारात्मक उत्तर देता येणार नाही, या वाक्यावर आमदार विखे पाटील यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, मंत्री महोदयांना सकारात्मक सूचना केली होती. ते नकारात्मक घेतील याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी सकारात्मक राहिले पाहिजे. म्हणजे त्यांना अधिक प्रमाणात सकारात्मक काम करता येईल म्हणून आपण ही सूचना मांडली.

प्रवराकाठच्या या दोन्ही नेत्यांचा जिल्ह्यात सवाल जबाबाचा संवाद सुरु असतो, आता विधानसभेतही त्यांचा संवाद रंगला!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com