आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचा उत्कर्ष - ना. तनपुरे

 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शेतीधंदा आता पूर्वीसारखा राहिला नसून यामधील नैसर्गिक व इतर अडचणींचा सामना करताना शेतकर्‍यांनी आता

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कष्टाच्या शेतीला देऊन व्यवसायात उत्कर्ष साधण्याची गरज राज्याचे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणार्‍या फसल कंपनीच्या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. अवकाळी पाऊस, वारा, वादळ, कीड, रोग, आदी अनेक अडचणींचा डोंगर शेती करताना शेतकर्‍यांसमोर उभा असतो. फसल कंपनीच्या या अत्याधुनिक तंत्र प्रणालीतून शेतकर्‍यांना यावेळी योग्य ते मार्गदर्शन मिळून निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाणी व खते इत्यादीत 50 ते 60 टक्के बचत होऊन उत्पन्नात 25 टक्केपर्यंत वाढ मिळेल, शेतकर्‍यांना पुढील काळातील हवामान, जमिनीची आर्द्रता, कीड, खतांची गरज फसल कंपनीचे अधिकारी उमेश भोसले यांनी या तंत्रप्रणालीची उपयुक्तता व सविस्तर माहिती याप्रसंगी शेतकर्‍यांना प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, संचालक बापूसाहेब गागरे, सुरेश बाफना, वसंत कोळसे, अ‍ॅड. पानसरे, नामदेव येवले, तुकाराम आडसुरे, काशिनाथ काकडे, विजय डौले, आदींसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. संदीप बाफना यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com