दूध आणि वीजदर प्रश्न लवकरच निकाली

राज्यमंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला विश्वास
दूध आणि वीजदर प्रश्न लवकरच निकाली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील दूध दर प्रश्न आणि वीज दर प्रश्नी सरकारने लक्ष घातले आहे. मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत या दोन्ही विषयांवर दोनदा चर्चा झालेली आहे. लवकरच यावर मार्ग निघणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी व्यक्त केला.

Title Name

तसेच मागील भाजप सरकारच्या काळामध्ये दुधाचे दर आणि दर वाढीसाठी झालेली आंदोलने आणि दाखल गुन्ह्यांची स्थिती पाहिल्यास सर्व काही स्पष्ट होईल, असा टोला भाजपला दूधप्रश्नावर सुरू केलेल्या आंदोलनावरून त्यांनी लगावला.

जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये झालेल्या बैठकीनंतर राज्यमंत्री ना. तनपुरे माध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, करोनामध्ये अनेक संकटे आलेली आहेत. यात शेतकरी देखील सुटलेला नाही. शहरातली मार्केट बंद असल्यामुळे मुंबई-पुण्यातील दुधाची मागणी घटल्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार दररोज जवळपास दहा लाख लिटरपर्यंत दूध खरेदी करत आहे. दूध दराचा प्रश्नी राज्य सरकार निश्चित मार्ग काढणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे.

केंद्राने दुधाच्या पावडर आयातीला परवानगी दिली. आम्ही त्यावर 20 टक्के सबसिडी लावावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली. मात्र, त्या मागणीचा विचार झाला नाही. राज्य सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. पण केंद्राकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये विजेच्या दराचा विषय सुरू आहे. कॅबिनेटच्या बैठकीत त्यावर दोन वेळेला चर्चा झालेली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत त्यातून लवकरच त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लॉकडाऊनवर वेळोवळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसोबत चर्चा केलेली आहे. लॉकडाऊनच्या विषयावर कोणतेही राजकारण नाही. सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेत जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थिती काय, यासंदर्भात केंद्र सरकारने जे काही निर्देश दिलेले आहे, त्याचे पालन केले जात आहे. त्याच पद्धतीने राज्य सरकार त्या भागांमध्ये निर्णय घेत आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. याबाबत विचारले असता राज्यमंत्री ना. तनपुरे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाबाबत आज नेमका काय निर्णय झालाय, त्याची मला माहिती घ्यावी लागेल. तसेच पार्थ पवार यांनी काय ट्विट केले आहे, तेही पहावे लागेल. सुशांतसिंग प्रकरणी मलाही सहानुभूती आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, त्याची अजिबात गरज नाही. राज्य सरकार हे बॅलेंस सरकार आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. तसेच सध्याच्या घडीला माझे लक्ष दुधाच्या प्रश्नावर जास्त आहे. कारण मी शेतकर्‍याचा मुलगा असून मला शेतकर्‍याच्या प्रश्नावर जास्त गांभीर्य आहे. आताही माझी त्याच अनुषंगाने बैठक सुरू होती,फ असेही ते म्हणाले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com