महिनाभरात प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबविणार

राज्यमंत्री तनपुरे : करंजीसह तालुक्यातील प्राथमिक उपकेंद्रांना दिली भेट
महिनाभरात प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबविणार

करंजी |वार्ताहर| karanji

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक गावातून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुणही आता पुढे येऊ लागले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होऊ नये, म्हणून उपकेंद्रामध्ये देखील नागरिकांना लस देण्याची व्यवस्था राहुरी, नगर, पाथर्डी या मतदारसंघात प्राधान्याने सुरू केली आहे. जिल्हाभरातील प्रत्येक गावात आणि उपकेंद्रात हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत करंजी गावासह सातवड, भोसे, दगडवाडी, खंडोबावाडी कानोबावाडी या गावातील नागरिकांना लसचा दुसरा डोस देण्यात आला. यावेळी राज्मंत्री तनपुरे यांनी करंजी येथे राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली व काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद देखील साधला. यावेळी मच्छिंद्र गोरे, सुधाकर आकोलकर, सुभाष अकोलकर यांनी सांगितले, तिसगावला पहिला डोस घेतला. त्यावेळेस मोठी गर्दी त्याठिकाणी दिसून आली..

ती गर्दी पाहून दुसरा डोस घेण्याची इच्छा नव्हती. परंतु राज्यमंत्री तनपुरे यांनी प्रत्येक गावात लस देण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमचे आभारी आहोत अशा शब्दांत तनपुरे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. लोहसर चिचोंडी मिरी येथे देखील तनपुरे यांनी आरोग्य उपकेंद्राला भेटी देत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, सरपंच अमोल वाघ, माजी सरपंच रफिक शेख, युवानेते जालिंदर वामन, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, डॉ होडशीळ यांच्यासह आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका उपस्थित होत्या

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com